
अहिल्यानगरमध्ये सध्या मतदार यादी मॅपिंगचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पण हे काम करताना बीएलओंना अक्षरशः नाकीनऊ येत आहेत. कारण काही मतदारांचा मतदारसंघ सापडत नाहीये, काहींच्या वडिलांचं नाव जुळत नाहीये तर काही मतदार तर यादीवर आहेत पण प्रत्यक्षात गायब झाले आहेत.
मंडळी, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक करण्यासाठी सध्या विशेष मॅपिंग मोहीम सुरू आहे. नवनागापूर ग्रामपंचायतीमध्ये हे काम करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्यात. नवनागापूर ही जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्येची ग्रामपंचायत मानली जाते. इथे मोठ्या प्रमाणात परप्रांतीय मतदार आहेत.
अनेक कामगार वर्षानुवर्षांपूर्वी इथे कामासाठी आले, त्यांची नावे मतदार यादीत नोंदली गेली पण आता ते इथून निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांचा शोधच लागत नाहीये. काही मतदारांना तर त्यांचा जुना मतदारसंघ कोणता हेच सांगता येत नाही. आणि सांगितला तरी तो बीएलओ अॅपवर जुळत नाही.
काही ठिकाणी मतदारांच्या आई-वडिलांची नावे देखील रेकॉर्डमध्ये सापडत नाहीत. त्यामुळे बीएलओंची मोठी अडचण होत आहे. पण अनेक वेळा मतदार एक माहिती सांगतो आणि ऑनलाईन रेकॉर्डमध्ये वेगळीच माहिती दिसते.
त्यामुळे तांत्रिक गोंधळ वाढत आहे. मंडळी, मतदार यादी अचूक असणं ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण ग्राउंड लेव्हलवर नेमक्या कोणत्या अडचणी येतात, हे या निमित्ताने समोर आलं आहे.





