Latest

कॅन्सर बरा करण्याचा दावा; आता औषधांचा खरा चेहरा लॅबमध्ये उघडणार

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे ‘सिद्धी’च्या जोरावर कॅन्सरसारखे असाध्य आजार बरे करतो, असा धक्कादायक दावा करणाऱ्या भोंदू बाबा राजेंद्र गडगेच्या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. त्याच्या आश्रमातून जप्त केलेल्या औषधांचा साठा नेमका कशाचा आहे, हे उलगडण्यासाठी प्रशासनाने ही औषधे तपासणीसाठी लॅबकडे पाठवली आहेत.

या कारवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.चौकशीदरम्यान आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणातील आणखी एक संशयित डॉ. मोहन पुरी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

गडगेच्या ‘दत्तधाम सरकार’ आश्रमातून मोठ्या प्रमाणावर औषधे जप्त करण्यात आली होती. ही औषधे नेमकी कोणती, त्यामध्ये कोणते घटक आहेत आणि ती मानवासाठी सुरक्षित आहेत का या सर्व बाबींची सखोल तपासणी पंचायत समितीच्या आरोग्य विभागामार्फत केली जात आहे. या अहवालावर पुढील कारवाईचे चित्र स्पष्ट होणार आहे.

आता सर्वांचे लक्ष लॅब अहवालाकडे लागले आहे. या औषधांच्या तपासणीतून गडगेच्या ‘चमत्कारां’मागील वास्तव समोर येणार असून, अनेकांच्या विश्वासाला धक्का बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button