
मंडळी, शेतकरी म्हटलं की डोळ्यांसमोर येतं कष्टाचं जीवन, शेतात राबणारे हात आणि पिकवलेल्या मालातून चार पैसे मिळवण्याची धडपड. पण अहिल्यानगरच्या इमामपूरमध्ये एका शेतात असं काही सापडलं, जे पाहून पोलिसही शॉक झालेत. नेमक काय आहे प्रकरण? सांगतो.
मित्रहो, झालं असं की, ६४ वर्षीय देवीदास रंगनाथ टिमकरे यांच्या शेतात झेंडूच्या पिकाआड गांजाची लागवड असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी पंचांसमक्ष शेताची पाहणी केली, तर झेंडूच्या रोपांमध्ये लहान-मोठी गांजाची झाडं आढळली.
यानंतर पोलिसांनी तब्बल ४४ किलो ४१५ ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत आहे २२ लाख २० हजार ७५० रुपये! टिमकरे यांना ताब्यात घेण्यात आलं असून, एमआयडीसी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पण मंडळी तुम्हाला काय वाटतं, आरोपीला काय शिक्षा झाली पाहिजे ? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा.





