Latest

ब्रेकिंग : अहिल्यानगरच्या ‘या’ माजी नगरसेवकासह चौघांवर ‘मोक्का’ ! नेमक प्रकरण काय ?

अहिल्यानगरमध्ये कोट्यवधींच्या जमीन व्यवहाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी नगरसेवकासह चौघांवर आता थेट ‘मोक्का’ची कारवाई करण्यात आली आहे.

सावेडीतील एका नामांकित डॉक्टरांचा विश्वास संपादन करून जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात तब्बल १४ कोटी ६६ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात माजी नगरसेवक स्वप्निल रोहिदास शिंदे, अमोल बबन जाधव, महेश नारायण कुऱ्हे आणि भारत फुलमाळी यांच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

डॉ. अनिल सूर्यभान आठरे यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून खोटे मालक उभे केल्याचा आरोप तपासात समोर आला.

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेने तयार केलेल्या मोक्का प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button