
आयकर विभागाचा छापा आणि त्यानंतर थेट नवरात्र उत्सवाच्या मिरवणुकीत झळकलेलं पोस्टर ! अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या नावाची पुन्हा चर्चा रंगलीये. पण या चर्चेमागचं नेमकं कारण काय ?
तर मंडळी केडगावमध्ये शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. याच मिरवणुकीदरम्यान डीजेच्या प्लाझ्मा स्क्रीनवर बॉस, दिग्गज हे गेममध्ये… असा मजकूर असणार कोट आणि संदीप कोतकर यांचं पोस्टर झळकलं. त्यामुळे आता राजकीय चर्चांना उधाण आलंय.
काही दिवसांपूर्वीच संदीप कोतकर यांच्या हॉटेल ‘संदीप’मध्ये आयकर विभागाने छापा टाकल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर सार्वजनिक उत्सवात झळकलेल्या पोस्टरमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मात्र, आयकर विभागाची कारवाई आणि पोस्टर यांचा परस्पर संबंध असल्याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. मग हे पोस्टर केवळ उत्सवाचा भाग होतं, की त्यातून काही राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न झाला? याच चर्चेकडे आता नगरकरांचं लक्ष लागलंय!





