Latest

उकळलेले दूध की कच्चे दूध ? आरोग्यासाठी कोणता पर्याय सुरक्षित ?

“कच्चे दूध जास्त पौष्टिक असते” असा समज अनेक लोकांमध्ये आहे. पण हेच दूध तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहित आहे का?

तज्ज्ञांच्या मते, कच्च्या दुधामध्ये सॅल्मोनेला, ई-कोलाई आणि लिस्टीरिया यांसारखे घातक बॅक्टेरिया असू शकतात. हे जीवाणू शरीरात गेल्यास पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि ताप यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हा धोका अधिक गंभीर मानला जातो.

याशिवाय, कच्च्या दुधातील जास्त सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम करू शकतात. तज्ज्ञ सांगतात की, यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा धोका वाढतो आणि हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाची शक्यता निर्माण होऊ शकते.

विशेष म्हणजे दूध उकळल्यावरही त्यातील कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन डी सारखे पोषक घटक मिळतात. त्यामुळे कच्चे दूधच अधिक फायदेशीर असते हा समज पूर्णपणे योग्य नाही. आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी दूध नेहमी उकळून किंवा पाश्चराइज्ड स्वरूपातच पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button