Latest

राहुरी बाजार समितीसमोर सापडला तरुणाचा मृतदेह ! तपासातून समोर आली धक्कादायक माहिती, नेमक प्रकरण काय?

राहुरी शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाजार समितीसमोर एका तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. हा तरुण नेमका कोण होता? त्याचा मृत्यू कसा झाला? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, १४ नोव्हेंबरच्या पहाटे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हा तरुण पडलेला नागरिकांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याला मृत घोषित केलं.

पोलिसांनी मृतदेहाची झडती घेतली असता काही रुग्णालयांची वैद्यकीय कागदपत्रं सापडली. त्यावरून हा तरुण मूळचा छत्तीसगडचा असून त्याचं नाव कृष्णा असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. त्याचं वय अंदाजे २५ ते २६ वर्षे आहे. त्याला क्षयरोगासह इतर आजार असल्याचंही कागदपत्रांतून समोर आलं आहे.

मात्र, पूर्ण नाव आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. त्यामुळे नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी राहुरी पोलिसांनी नागरिकांना मदतीचं आवाहन केलं आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button