
शहरातील इम्पेरियल चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ ‘गँग्स ऑफ वासेपुर’ या चित्रपटाप्रमाणे गर्दीसमोरच खुलेआमपणे दोघाविरुद्ध खुनी हल्ला करण्यात आला.
या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात ओंकार घोलप टोळीविरुद्ध मध्यरात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
नो पार्किंग मधील वाहन उचलल्याच्या रागातून एक कृत्य करण्यात आले. दोघे जखमी गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
विशाल माणिक भोरे हे आपल्या सहकाऱ्यांसह इम्पेरियल चौक परिसरात असताना आरोपींनी त्यांच्याशी वाद घातला. त्यानंतर घोलप व इतरांनाही फायटरने मारहाण केली. यावेळी एका आरोपीने वाहन जखमी कर्मचाऱ्याच्या पायावर घातल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेमुळे इम्पेरियल चौक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना शहरात दहशत निर्माण करणारे आहे. त्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत.
अशा गुन्हेगारी टोळ्या पोसणाऱ्यांची पायामुळे खणून काढून कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. घोलप याच्याविरुद्ध यापूर्वीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.





