Latest

मोठी बातमी : भिंगारला नगरपरिषदेचा दर्जा मिळणार का ? आमदार संग्रामभैया जगताप यांनी दिली मोठी अपडेट

भिंगार शहराचा विकास रखडण्यामागचं मुख्य कारण काय? आणि आता या शहराला छावणी परिषदेच्या जाचातून मुक्त करण्यासाठी कोणते प्रयत्न सुरू आहेत? याबाबत आमदार संग्रामभैय्यांनी मोठी अपडेट दिली आहे.

भिंगारला छावणी परिषद असल्यामुळे अनेक विकासकामांना अडचणी येतात आणि कामांना विलंब होतो. त्यामुळे छावणी परिषद रद्द करून भिंगारला नगरपरिषदेचा दर्जा मिळावा, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार जगताप यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, प्रभाग क्रमांक ६ आणि ७ मधील पंचशील वेश ते साईबाबा मंदिर या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासह गटार आणि फुटपाथच्या कामाचं भूमिपूजन जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं.

विशेष म्हणजे, जमिनीखालील प्रश्न आधी सोडवून मग रस्त्यांची कामं केली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, अग्निशामक दल, विद्युत दाहिनी आणि बाजारतळ सुशोभीकरणाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. आता भिंगारला नगरपरिषदेचा दर्जा कधी मिळणार, याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button