Latest

मोठी बातमी ! आता ‘या’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी तीस हजार रुपयांची मदत, जाणून घ्या…

अतिवृष्टी, पूर आणि दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने मदतीच्या निकषांमध्ये बदल केला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना पूर्वीपेक्षा जास्त नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. नेमका कसा आहे सरकारचा निर्णय ? जाणून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, नव्या दरांनुसार जिरायती शेतीसाठी हेक्टरी ८ हजार ५०० ऐवजी ११ हजार रुपये, बागायतीसाठी १७ हजारांऐवजी २२ हजार रुपये, तर फळबागांसाठी २२ हजार ५०० ऐवजी ३० हजार रुपये मिळणार आहेत.

एवढंच नाही, मोठ्या जनावरांच्या मृत्यूसाठी ४० हजारांऐवजी ५० हजार, तर लहान जनावरांसाठी ४ हजारांऐवजी ५ हजार १०० रुपये मिळतील. नैसर्गिक आपत्तीत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आता ४ लाखांऐवजी ८ लाख रुपये मदत मिळणार आहे.

हे सुधारित निकष २०२६-२७ पासून लागू करण्याची तरतूद आहे. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे. तर मग मंडळी या वाढीव मदतीबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button