Latest

मोठी बातमी : शनि शिंगणापूरमध्ये पिशवी-पर्सपासून पार्किंगपर्यंत नवे नियम ! शनी अमावस्येला थेट दर्शनाची पद्धतचं बदलली, जाणून घ्या नवे नियम

शनी अमावस्येनिमित्त शनिवारी शनि शिंगणापूर येथे मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी प्रशासन आणि देवस्थान ट्रस्टकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

यंदा अमावस्येच्या दिवशी भाविकांना चौथ्यावर जाऊन शनिदर्शन घेता येणार नाही. केवळ मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार आहे. दर्शनासाठी मुख्य महाद्वारातून प्रवेश करावा लागेल.

तेल अर्पण करण्यासाठी महाद्वारात मोठे टँक ठेवण्यात आले असून, तेलाच्या बाटल्या त्यातच अर्पण कराव्या लागतील. मोठे तेलाचे डबे किंवा बॉक्स रांगेत नेण्यास बंदी असेल.

गर्दी टाळण्यासाठी मार्गानुसार स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. निश्चित पार्किंगनंतर चारचाकी वाहनांना गावात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांसाठी अतिरिक्त एसटी बसेसही सोडल्या जाणार आहेत.

सुरक्षेच्या कारणास्तव पिशव्या आणि लेडीज पर्सला बंदी आहे. मौल्यवान वस्तू व मोठी रोकड सोबत न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मंदिर परिसरात उघड्यावर अन्नदान आणि महाप्रसाद शिजवण्यावरही बंदी राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button