Latest

मोठी बातमी : अहिल्यानगरमधील ‘या’ बड्या हॉटेलचा परवाना रद्द…..नेमकं कारण काय ?

अहिल्यानगरमधील यश पॅलेस हॉटेलविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. हॉटेलचा अन्न परवाना रद्द करण्याचा आदेश सहाय्यक आयुक्त गौरव जगताप यांनी सोमवारी जारी केला.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने काही काळापूर्वी हॉटेलची तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये काही त्रुटी आढळून आल्या. त्यानंतर प्रशासनाने संबंधित हॉटेल व्यवस्थापनाला त्रुटींमध्ये सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावली होती.

मात्र, नोटीस देऊनही अपेक्षित सुधारणा करण्यात आल्या नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. त्यामुळे नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अखेर यश पॅलेसचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ही कारवाई अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे. आता या कारवाईनंतर हॉटेल व्यवस्थापनाकडून पुढे काय पाऊल उचलले जाते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button