
मंडळी, यंदा सोयाबीनचा बाजार तेजीत राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पण तेजीचे कारण काय ? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. आता सोयाबीनचे भाव हळूहळू तेजीत येत आहेत. उत्पादन घटलं, तर येत्या काळात भावाला आणखी आधार मिळू शकतो.
‘सोपा’च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात गेल्या हंगामात ५२.२ लाख टन सोयाबीनचं उत्पादन झालं होतं. यंदा मात्र ते ३४.९ लाख टनांवर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच तब्बल १७.३ लाख टनांची घट !
त्यात देशांतर्गत पुरवठा कमी, जुन्या साठ्याची कमतरता आणि सोयामीलची वाढती मागणी यामुळे बाजारात तेजीचे संकेत आहेत. सध्या चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याचं सांगितलं जातंय. तर केंद्राचा हमीदर ५ हजार ७०८ रुपये आहे.
बाजार विश्लेषकांनी सोयाबीनचे भाव यावर्षी १० हजारांवर जाणार असा अंदाज सांगितला आहे. पण तुम्हाला काय वाटतं ? यंदा सोयाबीनचा भाव दहा हजार रुपयांचा टप्पा गाठणार का?





