
नागपूरच्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दर्शनासाठी जाण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २४ विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. यातील पुणे-नागपूर आणि सोलापूर-नागपूर मार्गावरील सहा फेऱ्यांचा फायदा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.
पुणे-नागपूर विशेष रेल्वे १९ आणि २१ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी पुण्याहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. परतीची नागपूर-पुणे गाडी २० आणि २२ ऑक्टोबरला रात्री ११ वाजता सुटेल.
तसेच सोलापूर-नागपूर विशेष गाडी १९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजून ५० मिनिटांनी सुटणार आहे. या विशेष गाड्यांना अहिल्यानगर, बेलापूर आणि कोपरगाव स्थानकांवर थांबा मिळणार आहे. त्यामुळे दीक्षाभूमीला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. म्हणून ही माहिती गरजू प्रवाशांपर्यंत नक्की पोहोचवा !





