
अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. काय आहे नवीन अपडेट? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, ऑक्टोबर महिन्याचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. राज्य सरकारने यासाठी तब्बल १७४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दरमहा मानधन वेळेत मिळावं, यासाठी शासनाकडून विविध स्तरांवर प्रयत्न केले जातात. त्याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर २०२६ या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता वितरित करण्यासाठी सरकारने निधी उपलब्ध करून दिला आहे.
या निर्णयामुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या मानधनासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करण्याचा मार्ग सुकर झाला आहे. संबंधित विभागाला हा निधी वितरित करून खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
मात्र, निधी मंजूर झाला म्हणजे प्रत्यक्ष पैसे खात्यात जमा झाले, असं नाही. प्रत्यक्ष जमा होण्याची तारीख संबंधित विभागाच्या पुढील कार्यवाहीवर अवलंबून असेल. तर मग मंडळी, तुम्हाला शासनाचा हा निर्णय कसा वाटतोय, कमेंट करून नक्की सांगा.





