Latest

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी ! बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च २०२७ या कालावधीत होणार आहे. तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्च २०२७ दरम्यान घेतली जाणार आहे.

याआधी बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान पार पडतील.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारीदरम्यान होतील.

म्हणजेच विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या तयारीसाठी नियोजन करण्याची संधी मिळणार आहे. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करून प्रत्येक विषयाला पुरेसा वेळ देणे महत्त्वाचे ठरणार आहे. तुमच्या घरात दहावी किंवा बारावीचा विद्यार्थी आहे का ? ही माहिती त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button