
दहावी-बारावीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी समोर आलीये. आता तब्बल ४६ खेळांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव गुण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.
मंडळी, राज्य शासनाने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या ४६ खेळांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा गुणांची सवलत मिळणार आहे.
या यादीमध्ये आप्टे-डू-आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पीडबॉल, टँग-सु-डो, फील्ड आर्चरी, माँटेक्स बॉल क्रिकेट, मिनीगोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअर बॉल, थायबॉक्सिंग, हाफकिडो बॉक्सिंग, रोप स्किपिंग, सिलंबम, वूडबॉल, टेनिस व्हॉलिबॉल, थांग ता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफ्टिंग, टेनिस क्रिकेट, बीच व्हॉलिबॉल, टार्गेटबॉल, जित कुने दो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हूप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रॉप रो बॉल, ग्रॅपलिंग, पेंटाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, शखांग मार्शल आर्ट, फुटबॉल टेनिस, बुडो, म्युझिकल चेअर, टेनिस बॉल क्रिकेट, कलरीपयत्तू आणि गटका या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रात सातत्याने नवीन खेळ लोकप्रिय होत असताना शासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.





