
शिर्डीसह परिसरातील आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे ! काय आहे नवीन अपडेट? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी मुंबई ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला नवा थांबा मंजूर झाला आहे. या गाडीला मनमाड रेल्वे जंक्शनवर अधिकृत व्यावसायिक थांबा मंजूर झाला आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, ही गाडी आधीही मनमाडला तांत्रिक कारणांसाठी थांबत होती. पण अधिकृत थांबा नसल्यामुळे प्रवाशांना तिथून गाडीत चढता किंवा उतरता येत नव्हतं. आता या निर्णयामुळे मनमाडसह मालेगाव, नांदगाव, चांदवड, सटाणा, देवळा आणि येवला परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
मात्र, थांबा मंजूर झाला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि तिकीट बुकिंग कधी सुरू होणार, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण, तुम्हाला काय वाटतं, उत्तर महाराष्ट्रासाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार का ? कमेंटमध्ये नक्की सांगा !





