Latest

मोठी बातमी : लाडक्या बहिणींसाठी ३३९ कोटी रुपयांचा निधी ! कधी मिळणार ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये, मंत्री संजय शिरसाट यांची मोठी माहिती

मंडळी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप न मिळाल्याने अनेक महिला पैशांची वाट पाहत आहेत.

आता या महिलांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्टच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने तब्बल ३३९ कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे. यासंदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय म्हणजेच जीआर देखील जारी केला आहे.

निधी वितरणानंतर संबंधित यंत्रणांमार्फत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे.

मात्र पैसे नेमक्या कोणत्या तारखेला खात्यात जमा होतील, याबाबत अद्याप निश्चित तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात हप्ता जमा झाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button