Latest

अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी महायुतीमध्ये मोठा संघर्ष ! राजनाथ सिंग यांच्या नगर दौऱ्यानंतर सस्पेन्स संपणार ?

“नगरची जागा कोणाची?” याच प्रश्नाने सध्या अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 16 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली असून 18 जूनला मतदान तर 22 जूनला मतमोजणी होणार आहे. त्यामध्ये अहिल्यानगरची जागा सर्वाधिक चर्चेत आली आहे.

या जागेवर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विजय मिळवला होता. त्यामुळे यंदाही पवार गट ही जागा कायम ठेवणार का, की भाजप स्वतःचा उमेदवार देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार उतरण्याचीही चर्चा सुरू आहे.

या निवडणुकीत नगरसेवक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य हेच मतदार असतात. त्यामुळे “मनी पॉवर” आणि “मसल पॉवर”ची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही बाजूंनी अद्याप अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नेते सध्या “वेट अ‍ॅण्ड वॉच”च्या भूमिकेत आहेत. आता 23 मे रोजी केंद्रीय मंत्री Rajnath Singh यांच्या दौऱ्यानंतरच या राजकीय समीकरणांचा खरा चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button