Explained

सावधान! तुम्ही लग्न करताय ‘ती’ कुमारिका आहे का? ४ मुलांची आई असलेल्या दारुड्या तरुणीचा भयंकर प्रताप

मित्रांनो, सावधान! जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी लग्नासाठी मुलगी शोधत असाल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा… कारण आज आम्ही तुम्हाला अशी सत्य घटना सांगणार आहोत, जी ऐकून तुमचे डोके चक्रावून जाईल!

अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका निष्पाप तरुणाने सुखाचा संसार थाटायचं स्वप्न पाहिलं. ४ लाख रुपये मोजून एका सुंदर मुलीशी लग्न केलं. विचार करा, घरात नवीन नवरी आली, कुटुंब आनंदात होतं… पण लग्नाला महिना उलटतो न उलटतो तोच नवरीचं असं भयानक रूप समोर आलं, ज्याने संपूर्ण राहुरी तालुका हादरलाय..! ती नवरी कुमारी नव्हतीच, तर ४ मुलांची आई होती. आणि धक्कादायक बाब म्हणजे, ती रोज रात्री काय करायची माहीत आहे? ती दारू आणि गुटख्याच्या नशेत असायची. काय आहे ही राहुरीची थरारक फसवणूक? आणि नगर जिल्ह्यातच असे प्रकार वारंवार का घडतायत?

ही घटना आहे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या चिंचोली फाटा परिसरातील. येथील एक तरुण गेल्या अनेक दिवसांपासून विवाहासाठी वधूच्या शोधात होता. आपल्या ग्रामीण भागात सध्या काय परिस्थिती आहे, हे तुम्हा- आम्हा सर्वांना ठाऊकच आहे. पोरांचे वय वाढत चालले तरी लग्न जुळत नाहीयेत. नेमक्या याच हतबलतेचा गैरफायदा घ्यायला टपले होते मुंबईचे काही एजंट!

या तरुणाला मुंबईतील एका महिला एजंटने गाठले. तिने सांगितले, ‘माझ्याकडे एक अतिशय देखणी आणि संस्कारी मुलगी आहे. पण तिच्या घरची परिस्थिती गरीब आहे. लग्न करायचे असेल, तर थोडे पैसे खर्च करावे लागतील.’

मुलीच्या आशेने व्याकुळ झालेल्या वर पक्षाने कसलाही विचार केला नाही. लग्नाची बोलणी झाली आणि या एजंट टोळीने थेट ४ लाख रुपये रोख मागितले. मुलाच्या घरच्यांनी कसेबसे पैसे उभे केले आणि महिनाभरापूर्वी थाटामाटात लग्न लावून दिले. नवरी घरात आली, घरात सुखाचे दिवस आले असं वाटत असतानाच नियतीने वेगळाच डाव टाकला होता.

लग्न झाले, नवरी सासरी आली. सुरुवातीचे काही दिवस सगळे काही ठीक चालले होते. पण हळूहळू नवरीचे खरे रंग दिसू लागले. घरात सुवासिक अत्तर दरवळायच्या ऐवजी एका वेगळ्याच गोष्टीची दुर्गंधी येऊ लागली. नवरी मुलीला चहाचे नाही, तर थेट दारू आणि गुटख्याचे भयंकर व्यसन होते. रात्रीच्या वेळी ही संस्कारी नवरी दारूच्या नशेत झिंगू लागायची. तोंडात गुटखा दाबून बसायची. मुलाच्या घरचे तर हे बघून अवाकच झाले! ज्या नवरीला घराची लक्ष्मी म्हणून आणले होते, ती तर व्यसनाच्या आहारी गेलेली निघाली.

पण खरी धक्कादायक बातमी पुढे आहे… घरच्यांना नवरीवर संशय आला. त्यांनी चोरून तिची पार्श्वभूमी तपासली, मुंबईत चौकशी केली. आणि जेव्हा सत्य समोर आले, तेव्हा मुलाच्या पायाखालची जमीनच सरकली! जिच्याशी या तरुणाने लग्न केले होते, ती कुणी कुमारीका मुलगी नव्हती… तिचे यापूर्वीच एक लग्न झाले होते आणि इतकेच नाही तर तिला तब्बल ४ मुलेही होती..! विचार करा, ज्या नवरीसाठी ४ लाख रुपये मोजले, ती आधीच ४ मुलांची आई निघाली! संपूर्ण कुटुंबाची फसवणूक झाली होती.

आता फसवणूक तर झाली होती. ४ लाख रुपये पाण्यात गेले होते. सामान्य माणूस असता तर नशिबाला दोष देत रडत बसला असता. पण या नवरदेवाने आणि त्याच्या नातेवाईकांनी हार मानली नाही. त्यांनी हुशारीने या टोळीला धडा शिकवायचे ठरवले. त्यांनी थेट वधूला आणि तिला पाठिंबा देणाऱ्या मुंबईच्या त्या एजंट टोळीला गाठले. शुक्रवारी दुपारी एक मोठा नाट्यमय प्रसंग घडला. नवरदेवाने आणि त्याच्या कुटुंबियांनी या व्यसनी वधूला आणि तिच्या साथीदारांना रंगेहात पकडले आणि थेट राहुरी पोलीस ठाण्यात आणले. राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी खळबळ उडाली. जेव्हा पोलिसांनी ही हकीकत ऐकली, तेव्हा पोलीसही चक्रावून गेले. सध्या पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

मित्रांनो, ही राहुरीची घटना काही पहिली घटना नाही. नगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत अशा अनेक ‘लुटेरी दुल्हन’च्या घटना समोर आल्या आहेत. कर्जत असो, जामखेड असो, शेवगाव असो की नेवासा… जिल्ह्यात अशा फसव्या एजंटांचे मोठे जाळे पसरले आहे. याचे मुख्य कारण काय? तर ग्रामीण भागातील मुलांची लग्ने न होणे! शेती करणाऱ्या किंवा कमी पगार असणाऱ्या तरुणांना मुली मिळणे कठीण झाले आहे. पोरांचे वय ३०-३२ पार चालले की आई-वडील चिंतेत पडतात. आणि याच चिंतेचा गैरफायदा हे भामटे एजंट घेतात. ५ लाख द्या, ३ लाख द्या, मुलगी अनाथ आहे, मुलगी गरीब आहे, असे सांगून परराज्यातील किंवा मुंबई-पुण्यातील फसव्या महिलांना नवरी बनवून आणले जाते. लग्न होते, पैशांची विल्हेवाट लागते आणि काही दिवसांतच या नवरी दागिने, पैसे घेऊन पसार होतात किंवा असे धक्कादायक वास्तव समोर येते.

आता या प्रकारातून वाचायचे कसे? जर तुम्ही लग्नासाठी एजंट कडून मुलगी पाहत असाल, तर डोळे मिटून विश्वास ठेवू नका.

१) मुलीच्या घरचा पत्ता स्वतः जाऊन व्हेरिफाय करा.
२) तिचे आधार कार्ड, ओळखपत्र आणि आधीचे लग्न झाले नसल्याचे दाखले तपासा.
३) कोणत्याही अनोळखी मध्यस्थाला लग्नाआधी लाखो रुपये रोख देऊ नका.

नाहीतर राहुरीच्या या तरुणासारखी तुमचीही आर्थिक आणि मानसिक फसवणूक होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button