Latest

अहिल्यानगरमध्ये नवीन लाल कांद्याची बाजारात आवक सुरु…; नव्या कांद्याला काय भाव मिळतोय ?

मंडळी राहाता बाजार समितीत रविवारी एक बदल पाहायला मिळाला. आतापर्यंत बाजारात गावरान कांद्याची आवक सुरू होती. आता त्याच्या जोडीला लाल कांदाही दाखल झाला आहे. पण, नवीन लाल कांद्याला काय भाव मिळतोय आणि नव्या कांद्यामुळे बाजारभावावर काही परिणाम झालाय का? चला जाणून घेऊयात.

मंडळी, रविवारी राहाता बाजार समितीत लाल कांद्याच्या ४७ गोण्यांची आवक झाली. या कांद्याला प्रतिक्विंटल ४ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव मिळाला. तर रेग्युलर कांद्याचा सर्वाधिक भाव ४ हजार ८०० रुपये होता.

गावरान कांद्याची आवक १ हजार २१९ गोण्या झाली. यात पहिल्या दर्जाच्या कांद्याला ३ हजार ६०० ते ४ हजार ८०० रुपये भाव मिळाला. दुसऱ्या दर्जाला २ हजार ३०० ते ३ हजार ५५० रुपये, तर तिसऱ्या दर्जाला १ हजार ते २ हजार २५० रुपये मिळाले.

दुसरीकडे, बाजारात ३ हजार ७ क्रेट डाळिंबांची आवक झाली. पहिल्या दर्जाच्या डाळिंबाला प्रतिकिलो २०१ ते ३५५ रुपये भाव मिळाला. तर मग, मंडळी लाल कांद्याची आवक सुरू झाल्याने बाजारभाव घसरू शकतात का? याबाबत तुमचं मत काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button