Latest

अहिल्यानगर जिल्हा परिषदेकडून ५० लाख पॅरासिटामॉल गोळ्यांची खरेदी! ५० लाख गोळ्या कुणासाठी ?

अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोट्यवधी रुपयांच्या औषध खरेदीची प्रक्रिया सुरू केली आहे.२४ सप्टेंबर रोजी जेईएम पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या निविदेत तब्बल १९९ प्रकारच्या औषधांचा समावेश आहे.यामध्ये पॅरासिटामॉलच्या ५० लाख, सेटिरीझिनच्या ३५ लाख, तर क्लोरफेनिरामाइनच्या ४० लाख गोळ्यांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

याशिवाय मधुमेह, रक्तदाब, संसर्ग, सर्पदंश आणि रेबीजवरील औषधे, इंजेक्शन, सिरप तसेच शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या साहित्याचाही समावेश आहे. या खरेदीमुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांतील रुग्णांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

मात्र, छत्रपती प्रतिष्ठानने या प्रक्रियेबाबत काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. मागील पाच वर्षांत कोणत्या कंपन्यांना कंत्राटे मिळाली? औषधांचे दर किती बदलले?

आधीचा साठा तपासला होता का? याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच निविदा कागदपत्रे, पुरवठादारांची माहिती आणि लेखापरीक्षण अहवाल तपासण्याची मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button