Explained

अहिल्यानगर हादरलं ! महिला पोलिसावर पतीचा हल्ला… ; पाठीत थेट कोयताच घातला…; नेमक प्रकरण काय ?

कायद्याचं रक्षण करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाला, तोही तिच्याच पतीकडून! अहिल्यानगर शहरात घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण?

मंडळी, शुक्रवारी, १७ ऑक्टोबरला जुना कोर्ट रोडवरील सबजेल चौकाजवळ हा प्रकार घडला. संबंधित महिला कर्मचारी कौटुंबिक न्यायालयातील कामकाज आटोपून परतत होती. त्याचवेळी तिचा पती रणवीर सिंह राठोड याने तिच्यावर कोयत्याने वार केल्याची माहिती आहे.

हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही या महिला कर्मचाऱ्याने धाडसाने स्वतःचा बचाव केला. विशेष म्हणजे, जखमी अवस्थेतही तिने आपली नेमणुकीची जागा गाठली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हल्ल्यानंतर पसार झालेल्या रणवीरला कोतवाली पोलिसांनी रात्री उशिरा अटक केली. त्याच्यावर जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमिना शेख करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button