
बहिणीला त्रास देत असल्याचा राग आला आणि मेव्हण्याने थेट दाजीचा जीव घेतला आणि त्यानंतर अपघाताचा बनाव रचला! अहिल्यानगरच्या रतडगावमध्ये नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, रतडगाव शिवारात सुभाष बाबासाहेब जगताप यांचा मृतदेह पुलाखाली आढळून आला. सुरुवातीला हा अपघात असल्याचा संशय निर्माण झाला, मात्र पोलिसांना घटनेत काहीतरी वेगळं असल्याचा संशय आला.
तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. दारूच्या नशेत बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून सुभाष यांच्या मेव्हण्याने, अमोल जाधव याने डोक्यात दगड घालून त्यांचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली.
त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुलाखाली टाकून अपघाताचा बनाव रचल्याचं समोर आलं. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांनी खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. तर मग मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





