
अहिल्यानगर जिल्ह्यातून एक अतिशय दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आलीये. संगमनेर तालुक्यात दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय.
मंडळी, तिगाव गावातील महेश सानप वय १८ आणि ओंकार सानप वय १४ अशी मृत्यू झालेल्या दोघा भावांची नावे आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हे दोघे भाऊ पोहण्यासाठी गावाजवळील दगडाच्या खाणीत गेले होते.
मात्र, खाणीत साचलेल्या पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती मिळताच सरपंच ज्ञानेश्वर सानप तातडीने घटनास्थळी पोहोचले.
ग्रामस्थांच्या मदतीने दोघा भावांना बाहेर काढण्यात आले आणि उपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु दुर्दैवाने डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही मृत घोषित केले.
या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मंडळी, उन्हाळ्याच्या काळात अनेक मुले आणि युवक पोहण्यासाठी धरण, खाणी किंवा खोल पाण्याच्या ठिकाणी जातात. पण अशा ठिकाणी छोटासा निष्काळजीपणा देखील जीवावर बेतू शकतो. तुमचं मत काय? कमेंट करा..





