
मध्य पूर्वेतील तणावामुळे कच्च्या तेलाचे दर सतत वाढत आहेत. त्याचा थेट परिणाम भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर झाला असून, इंधन दर दोन वेळा वाढले आहेत. पेट्रोल डिझेलचे भाव येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचदरम्यान भारतीय रुपयाची घसरणही चिंतेचा विषय बनली आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया जवळपास ९७ पर्यंत पोहोचल्याने आरबीआय अलर्ट मोडवर आले आहे. काही तज्ज्ञांनी तर रुपया १०० पार जाण्याचा अंदाज वर्तवला आहे. या परिस्थितीत रुपयाला स्थिर ठेवण्यासाठी आरबीआय रेपो रेट वाढवू शकते, अशी चर्चा सुरू आहे.
जर रेपो रेट वाढला, तर घर, कार किंवा वैयक्तिक कर्ज घेतलेल्या लोकांच्या EMI मध्ये थेट वाढ होऊ शकते. तसेच NRI डिपॉझिट स्कीम आणि डॉलर बॉन्डसारखे पर्यायही सरकार विचारात घेत आहे.
३ ते ५ जूनदरम्यान होणाऱ्या आरबीआयच्या बैठकीकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. पण मंडळी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.





