
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २१ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांची संख्या पाहता राजकीय समीकरणांना चांगलाच रंग चढला आहे.
अकोलेमध्ये किरण लहामटे, वैभव पिचड, अमित भांगरे आणि सीताराम गायकर यांच्या नावांची चर्चा आहे. कोपरगावात विवेक कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यासमोर नव्या इच्छुकांचे आव्हान आहे.
श्रीगोंद्यात महायुतीतील इच्छुकांची संख्या सर्वाधिक असल्याचे चित्र असून, संग्राम जगताप यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत. पारनेरमध्ये काशिनाथ दाते आणि सुजित झावरे इच्छुक आहेत.
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांच्या नावाचा ठराव नसल्याने ते निवडणुकीपासून अलिप्त आहेत, तर राम शिंदे यांच्या नावाचे दोन ठराव आहेत. श्रीरामपुरात भानुदास मुरकुटे आणि करण ससाणे एकत्र येणार का, याकडे लक्ष लागलंय.
दरम्यान, चंद्रशेखर घुले पुन्हा अध्यक्षपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. नगरमध्ये अक्षय कर्डिले की सुवर्णा कोतकर, यावरही उत्सुकता आहे.





