Latest

एका अपघाताने अख्खं कुटुंब पोरकं केलं ! नेवासा-श्रीरामपूर मार्गावर बुलेटचा ताबा सुटला आणि भयंकर घडलं…. तीन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत !

तीन सख्खे भाऊ… तिघांच्याही डोळ्यांत भविष्याची स्वप्नं… पण एका भीषण अपघाताने अहिरे कुटुंबाचा आधारच हिरावून घेतला. नेवासा-श्रीरामपूर मार्गावर घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील माळीचिंचोरा येथील अंबादास अहिरे यांची तीन मुले गुरुवारी रात्री बुलेटवरून नेवासा येथून श्रीरामपूरकडे जात होती.

रात्री साडेनऊच्या सुमारास पुनतगाव फाट्याजवळ त्यांच्या बुलेटची अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, आदित्य अहिरे (वय १६), दीपक अहिरे (वय १४) आणि चैतन्य अहिरे (वय १२) या तिन्ही सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.

एकाच घरातील तीन चिमुकली स्वप्नं काळाने हिरावून घेतली. ज्या घरात मुलांच्या आवाजाने आनंद फुलत होता, तिथे आता शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. या हृदयद्रावक घटनेने माळींचिंचोरा परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button