Latest

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट…! ‘या’ एका नियमामुळे भानुदास मुरकुटे निवडणूकीच्या रिंगणातून आऊट; स्वतःचं दिली मोठी माहिती

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या उमेदवारीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. नेमकं कारण काय? तर मंडळी, मुरकुटे यांनी कमलपूर सोसायटीतून जिल्हा बँकेसाठी ठराव घेतला होता.

मात्र, या संस्थेचा २०२५-२६ चा ऑडिट वर्ग ‘क’ असल्याने निवडणूक नियमांनुसार त्यांची उमेदवारी अडचणीत आल्याचं समोर आलं आहे. याशिवाय, अशोक सहकारी बँकेच्या बिगरशेती मतदारसंघातूनही त्यांनी ठराव घेतल्याची माहिती आहे.

मात्र, त्या ठिकाणीही अडचण निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुरकुटे यांनी स्वतःच निवडणूक लढवता येत नसल्याचं स्पष्ट केलं आहे. श्रीरामपूरच्या राजकारणात मुरकुटे यांचं महत्त्वाचं स्थान मानलं जातं.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांची भूमिका चर्चेत असतानाच आता त्यांच्यावर निवडणुकीबाहेर राहण्याची वेळ आली आहे. या घडामोडीनंतर श्रीरामपूर मतदारसंघातील पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button