
मंडळी, विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल जाहीर झाले असून राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. कुठे भाजपने बाजी मारली, तर कुठे शरद पवारांच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला ! नेमका कसा राहिला निकाल? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मित्रहो, पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे कौस्तुभ गावडे यांनी ६,६७० मतांच्या फरकाने विजय मिळवला. त्यांनी अपक्ष उमेदवार सचिन सानप यांचा पराभव केला.
दुसरीकडे, पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या डॉ. स्मिता जाधव यांचा पराभव केला.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात शरद पवार गटाचे प्रतापसिंग पाटील विजयी झाले, तर अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीचे किरण सरनाईक यांनी बाजी मारली.
सर्वाधिक चर्चेचा निकाल नागपूरमध्ये लागला. येथे काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांच्यावर मात केली. अशा प्रकारे पाचपैकी दोन जागा महायुतीने, तर तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर मग मंडळी, तुम्हाला या निकालाबद्दल काय वाटतं ? कमेंट करून नक्की सांगा.





