
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठं विधान केलंय. नंदुरबारमध्ये माध्यमांशी बोलताना तटकरे म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला अजित पवार यांचं नाव देण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करू शकतं. मात्र, अंतिम निर्णय शासनस्तरावर घेतला जाणार आहे.
विशेष म्हणजे, या योजनेच्या निर्मितीत अजित पवार यांचाही महत्त्वाचा वाटा होता. महिलांसाठी २१ ते ६५ वर्षे वयोगट निश्चित करण्याची सूचना अजितदादांनी केली होती. तर अविवाहित तरुणींना योजनेत समाविष्ट करण्याची सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
सुरुवातीला १२०० रुपये असलेली मदत १५०० रुपये करण्याचा निर्णय एकनाथ शिंदेंनी घेतला होता. आता अजितदादांचं नाव योजनेला मिळणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
मात्र, अद्याप अधिकृत निर्णय झालेला नाही. तर मग मंडळी, तुम्हाला काय वाटतं? योजनेला अजितदादांचं नाव द्यावं का? कमेंट करून नक्की सांगा.





