Latest

उधारीवर औषध दिलं नाही म्हणून मेडिकल चालकासह त्याच्या कुटुंबासोबत भयंकर घडलं….! राहुरीत एकच खळबळ

उधारीवर औषध देण्यास नकार दिला, म्हणून थेट मेडिकल चालकासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात घडलीय.

मानोरी येथील माऊली मेडिकलमध्ये २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अक्षय पिसाळ हे मेडिकलमध्ये असताना विशाल आढाव याने त्यांच्याकडे उधारीवर औषधे का दिली नाहीत, असा जाब विचारत शिवीगाळ आणि मारहाण सुरू केली.

वाद सोडवण्यासाठी अक्षय यांचे भाऊ, आई-वडील धावून आले. मात्र, त्यानंतर इतर आरोपीही घटनास्थळी दाखल झाले. चौघांनी मिळून पिसाळ कुटुंबाला लाकडी दांडके, लोखंडी गज आणि कुऱ्हाडीने मारहाण केल्याचा आरोप आहे. इतकंच नाही, तर जीवे मारण्याची धमकी देत आरोपी निघून गेले.

या प्रकरणी विशाल आढावसह वैभव वसंत आढाव, विवेक वसंत आढाव व वसंत फ्रान्सिस आढाव या चार जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. उधारीवर औषध न देणं हा गुन्हा आहे का ? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. या घटनेने परिसरात संताप व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button