Latest

शेतकऱ्यांसाठी स्वातंत्र कायदा हवा… ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची मागणी काय ?

शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या जीवाची जबाबदारी नेमकी कोण घेणार? सर्पदंश असो, वन्यप्राण्यांचा हल्ला असो किंवा दुष्काळाचं संकट… अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना संरक्षण मिळावं, यासाठी आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. अण्णांची मागणी नेमकी काय? चला जाणून घेऊयात.

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगणसिद्धी इथं अण्णा हजारेंची भेट घेण्यासाठी सेवानिवृत्त कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोक ढगे आणि अशोक सब्बन आले होते. यावेळी शेतकरी संरक्षण कायद्यावर चर्चा झाली.

अण्णा हजारे यांच्या मते, शेतकऱ्यांना सध्या कायद्यानुसार पुरेसं संरक्षण मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र कायदा असणं गरजेचं आहे. अमेरिका आणि इस्रायलसारख्या देशांमध्ये शेतकऱ्यांच्या संरक्षणावर भर दिला जातो, असंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.

म्हणून सर्पदंश, वन्यप्राण्यांचे हल्ले, ढगफुटी आणि दुष्काळ अशा संकटांपासून शेतकऱ्यांचं संरक्षण व्हावं, अशी त्यांची भूमिका आहे. आता, सरकार या मागणीवर काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण अण्णांच्या या मागणीशी तुम्ही सहमत आहात. का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button