Latest

अहिल्यानगर जिल्ह्यावर भयानक संकट ! ‘या’ रोगकिडींचा हल्ला ! उसाचे क्षेत्र नष्ट होणार ? हजारो हेक्टर ऊस बाधित !

अहिल्यानगर जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर नवं संकट उभं राहिलंय! पावसाळ्याचे साडेतीन महिने होत आले, तरी अनेक विहिरी कोरड्याच आहेत. त्यातच लांबलेला पाऊस, सततचं ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे उसावर विविध रोगकिडींचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतोय.

मंडळी नेवासा तालुक्यात सध्या पायरीला, पांढरी माशी आणि जमिनीतून हुमणी या किडींचा उसाला फटका बसतोय. तब्बल १ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर तीव्र, तर ५ हजार हेक्टरवर सौम्य प्रादुर्भाव झाल्याची माहिती आहे. म्हणजेच एकूण ६ हजार ५०० हेक्टर ऊस बाधित झालाय.

नेवासा हा ऊस उत्पादनाचा मोठा पट्टा मानला जातो. यंदा ज्ञानेश्वर कारखान्याकडे तब्बल २२ हजार ३१५ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे ८६०३२ या वाणावर किडींचा प्रभाव अधिक दिसतोय. ऊसतज्ज्ञांनी कीड नियंत्रणासाठी योग्य कीटकनाशकांची फवारणी आणि जैविक उपाय करण्याचा सल्ला दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button