Latest

नियतीने डाव साधला… नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर तीन ट्रकचा भीषण अपघात, चालकाचा जागीच मृत्यू !

पहाटेचे तीन वाजले होते… महामार्गावर वाहतूक सुरू असतानाच तीन मालवाहू वाहनांची भीषण धडक झाली. या अपघातात एका चालकाचा मृत्यू झाला, तर दुसरा चालक गंभीर जखमी झालाय. नेमकी ही घटना कुठे आणि कशी घडली? सगळं सांगतो. पण आधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

ही घटना अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हंडीनिमगाव शिवारात सोमवारी, १९ ऑक्टोबरला घडली. पुण्याहून भंगार माल घेऊन जालन्याकडे जाणाऱ्या ट्रकला एका मालवाहू ट्रेलरने धडक दिली.

या धडकेनंतर दुसरा ट्रक रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूला गेला आणि प्रमोद भोंडवे यांच्या ट्रकला समोरून धडकला. या भीषण अपघातात उमेश दादाराव वढणे यांचा मृत्यू झाला. तर प्रमोद भोंडवे यांच्या उजव्या पायाचे हाड मोडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

या प्रकरणी ट्रेलरचालक प्रकाश रंगारी याच्याविरोधात नेवासे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. तुमच्या मते, महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना गरजेच्या आहेत? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button