
गरोदरपणापासून बाळाच्या उपचारांपर्यंत सर्व काही मोफत! नाशिकच्या एसएमबीटी हॉस्पिटलने गरजू कुटुंबांसाठी मोठा आधार दिला आहे.
ग्रामीण भागातील महिलांना सुरक्षित मातृत्व मिळावं आणि माता-बालमृत्यू रोखण्यासाठी हॉस्पिटलच्या वतीने विशेष उपक्रम राबवला जात आहे.
या उपक्रमांतर्गत नॉर्मल प्रसूती असो किंवा सिझेरियन, दोन्ही प्रकारच्या प्रसूती मोफत केल्या जातात. एवढंच नाही, तर गर्भवती महिलांच्या चारही सोनोग्राफी तपासण्याही मोफत उपलब्ध आहेत.
आकडेवारी पाहिली, तर आतापर्यंत ५ हजारांहून अधिक महिलांनी प्रसूतीपूर्व सेवांचा लाभ घेतला असून, १८ हजारांहून अधिक सोनोग्राफी मोफत करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत २४ डोहाळे जेवणाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.
विशेष म्हणजे, जन्मापासून ते १६ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींनाही विविध वैद्यकीय उपचार मोफत दिले जातात. या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांचा उपचारांचा आर्थिक भार कमी होण्यास मदत होत आहे. तुम्हाला एसएमबीटी हॉस्पिटलचा हा उपक्रम कसा वाटतोय ? कमेंट करून नक्की सांगा!





