
साखरेच्या दरात गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा मोठी वाढ पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात साखरेचा भाव 56 रुपयांवर पोहोचलाय. पण दिवाळीत रेट आणखी वाढणार का ? सांगतो. पण, आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, दिवाळीच्या तोंडावर साखरेच्या बाजारात मोठी घडामोड घडली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेची टंचाई निर्माण होऊन दर वाढू नयेत, यासाठी केंद्र सरकारने कच्ची साखर आयात करण्यास परवानगी दिली होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात आयात न झाल्याने आता या निर्णयाची मुदत ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
सध्या घाऊक बाजारात साखर साधारण ४६ ते ४८ रुपये किलोने उपलब्ध आहे. तर आयात केलेली कच्ची साखर प्रक्रिया करून बाजारात आणण्याचा खर्च ५५ ते ५७ रुपये किलोपर्यंत जातोय.
दरम्यान, २०२६-२७ च्या हंगामावर दुष्काळाचं सावट असल्याने उसाचं उत्पादन आणि साखर कारखाने किती दिवस चालतील, याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी काळात साखरेचे दर कोणत्या दिशेने जातात, याकडे ग्राहक आणि साखर उद्योगाचं लक्ष लागलं आहे. तुमच्या भागात साखरेचा भाव काय ? कमेंटमध्ये नक्की सांगा.





