
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदासाठी आता श्रीगोंद्यातील दोन बड्या नेत्यांची नावं चर्चेत आली आहेत. नेमकं काय घडतंय? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर पॉलिटिक्सला नक्की फॉलो करा.
मंडळी, माजी आमदार राहुल जगताप आणि युवा नेते प्रतापसिंह पाचपुते या दोन नेत्यांच्या नावांची तज्ञ संचालक पदासाठी चर्चा सुरू आहे. खरेतर जिल्हा बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत प्रतापसिंह पाचपुते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर त्यांनी माघार घेतली. दुसरीकडे माजी आमदार राहुल जगताप यांनीही संचालकपदाच्या निवडणुकीतून माघार घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
आता या दोघांची नावं तज्ज्ञ संचालकपदासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे वरिष्ठ नेते कोणाच्या नावाला पसंती देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग मंडळी श्रीगोंद्याला जिल्हा बँकेत प्रतिनिधित्व मिळणार का? आणि मिळालं तर कोणाला? तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा!





