Latest

काय सांगता ! आता हार्ट अटॅकचा धोका ३० वर्षे आधीच समजणार ? नव्या संशोधनाची जगभर चर्चा

तुम्हाला हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक येण्याची शक्यता तब्बल ३० वर्षे आधीच समजू शकली, तर? होय, एका नवीन संशोधनातून असाच महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे. नेमकं कसं आहे हे नव संशोधन? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.

मंडळी, नव्या संशोधनानुसार केवळ रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉलच नाही, तर रक्तातील काही विशिष्ट प्रथिनांच्या आधारेही भविष्यातील हृदयविकाराचा धोका ओळखता येऊ शकतो.

‘जामा नेटवर्क ओपन’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात सुमारे १ लाख १४ हजार निरोगी व्यक्तींच्या आरोग्याचा ३४ वर्षे मागोवा घेण्यात आला. यामध्ये कार्डियाक ट्रोपोनिन, सी-रिअॅक्टिव्ह प्रोटीन आणि NT-proBNP या तीन जैविक घटकांचा अभ्यास करण्यात आला.

यात, हार्ट अटॅक किंवा स्ट्रोक आलेल्या व्यक्तींमध्ये काही रक्तघटकांमधील बदल तब्बल ३० वर्षे आधीपासूनच दिसत होते. मात्र, हे संशोधन अजून प्रायमरी स्टेजला आहे. पण, या संशोधनामुळे भविष्यात हृदयविकाराचं लवकर निदान आणि प्रतिबंध शक्य होऊ शकतो. तर मग मंडळी तुम्हाला या संशोधनाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button