Latest

दिवाळीच्या रात्री पंचपीर चावडीवर राडा…. कोयते सापडले, आमदार संग्राम जगताप मध्यरात्री पोलीस ठाण्यात! नेमक प्रकरण काय?

दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच अहिल्यानगरच्या पंचपीर चावडीवर अचानक तणाव निर्माण झाला. फटाक्यांवरून सुरू झालेला वाद थेट कोयत्यांपर्यंत पोहोचला! नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, ८ नोव्हेंबरच्या रात्री रस्त्यावर फटाके फोडण्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याच्या मुद्द्यावरून दोन गटांत वाद झाल्याची माहिती आहे. हा वाद वाढताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते घटनास्थळी जमा झाले आणि संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी करू लागले.

दरम्यान, घटनास्थळावर कोयते आढळल्याने एकच खळबळ उडाली. कोतवाली पोलिसांनी हे कोयते जप्त केले. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती शांत केली.

विशेष म्हणजे, आमदार संग्राम जगताप यांनीही मध्यरात्री पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती घेतली. या प्रकरणी तीन ते चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

आता तपासात काय समोर येतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button