
लग्नाचं स्वप्न पाहणाऱ्या एका तरुणीला वारंवार हिणवलं गेलं… मानसिक त्रास इतका वाढला की, अखेर तिने टोकाचं पाऊल उचललं. श्रीगोंद्यात नेमकं काय घडलं? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, श्रीगोंदा शहरातील दत्तवाडी परिसरात ही घटना घडली. मयूरी सुनील मखरे असं मृत तरुणीचं नाव असून तिचं वय अवघं २७ वर्ष होतं.
कुटुंबीय ऑगस्ट २०२५ पासून तिच्यासाठी लग्नाचं स्थळ शोधत होते. मात्र, जमलेलं स्थळ मोडण्यासाठी मयूरीबाबत चुकीची माहिती दिल्याचा आरोप आहे. एवढंच नाही, तर प्रतीक सुरेश भुजबळ याने ‘तुझे लग्न होणार नाही’ असं म्हणत वारंवार मानसिक त्रास दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.
हा त्रास असह्य झाल्याने १८ ऑक्टोबर रोजी मयूरीने राहत्या घरी आत्महत्या केली. या प्रकरणी प्रतीक भुजबळविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८ नुसार गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. तर मग मंडळी तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





