Latest

नोव्हेंबरमध्येही अवकाळी पाऊस धडकणार ! पंजाबराव डख यांनी सांगितल्या पावसाच्या तारखा; महाराष्ट्रातील कोणते जिल्हे भिजणार?

ऑक्टोबर संपला, नोव्हेंबर सुरू झाला, तरी अवकाळी पावसाचं संकट काही टळताना दिसत नाहीये ! पुढचे चार दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी पाऊस होईल असा अंदाज पंजाबराव डख यांनी दिला आहे. नेमका कसा आहे पंजाबराव डख यांचा अंदाज ? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, १ ते ४ नोव्हेंबरदरम्यान महाराष्ट्रात काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळमध्ये पावसाची शक्यता आहे.

तर मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांनाही पावसाचा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चक्रीवादळाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्या आणि हवामानाच्या बदलाकडे लक्ष ठेवा. तर मग मंडळी तुम्हाला पंजाबराव डख यांचा अंदाज कसा वाटला ? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button