
अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात दरोडे, घरफोड्या आणि खुनाच्या प्रयत्नांसारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे चर्चेत असलेल्या पारनेरच्या भोसले टोळीवर आता पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली? जाणून घेऊयात. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
टोळीचा म्होरक्या रमेश सावत्या भोसले याच्यासह ११ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार म्हणजेच मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या कारवाईच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीने अहिल्यानगर जिल्ह्यातील एमआयडीसी, नगर तालुका, सुपा, बेलवंडी आणि श्रीगोंदा, तसेच पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात गंभीर गुन्हे केल्याचा आरोप आहे.
सुपा पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यात मोक्क्याची कलमे वाढवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे. तुमच्या मते, अशा कारवायांमुळे गुन्हेगारीला आळा बसेल का? कमेंट करून तुमचं मत सांगा!





