Latest

बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ… पण महाराष्ट्राला होणार फायदा ! ‘या’ भागात पावसाची शक्यता

पावसाळा संपला, आता कुठे शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी सुरू केलीय आणि आता पुन्हा एकदा पाऊस परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे ! नेमका कसाय हवामान अंदाज? सांगतो. पण, त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून, त्याची तीव्रता वाढल्यास चक्रीवादळात रूपांतर होऊ शकतं. या संभाव्य चक्रीवादळाला ‘अर्णव’ असं नाव देण्यात आलंय.

हवामान तज्ज्ञ मयुरेश प्रभुणे यांच्या अंदाजानुसार, हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकल्यानंतर मध्य प्रदेशच्या दिशेने सरकलं, तर महाराष्ट्रातही पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

विशेष म्हणजे, २७ ते २९ ऑक्टोबरदरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. या पावसाचा रब्बी पेरण्यांना काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं राहणार हे पाहावे लागेल. पण, तुमच्या भागात पावसाची स्थिती काय ? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button