
रोजच्या जेवणातला भातही आता महाग होणार आहे. अहिल्यानगरच्या बाजारात गेल्या सहा महिन्यांत तांदळाच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. यामागचं कारण आहे धानाची घटलेली उपलब्धता आणि उत्पादनावर झालेला परिणाम. पण, कोणत्या तांदळासाठी किती पैसे मोजावे लागत आहेत. सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, आंबेमोहर तांदूळ आधी १०० रुपये किलो होता, तो आता थेट १५० रुपयांवर पोहोचला आहे. कोलम तांदळाचे दर ५० ते ६५ रुपयांवरून ९५ ते १०० रुपये किलो झाले आहेत.
मदर इंडिया तांदूळ ५० रुपयांवरून ७० रुपयांपर्यंत, तर इंद्रायणी ४८ ते ५० रुपयांवरून ६५ ते ७० रुपये किलो झाली आहे. बासमतीचे दरही ११५ ते १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
कमी पाऊस, धानाचं घटलेलं उत्पादन आणि बाजारातील तुटवडा यामुळे ही दरवाढ झाल्याचं व्यापारी सांगतात. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये नवीन तांदूळ बाजारात आल्यानंतर दर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. तुमच्या शहरात तांदूळ किती रुपयांनी महागला? कमेंटमध्ये नक्की सांगा!





