Latest

धक्कादायक ! जेवणाचं ताट हरवलं म्हणून छळ, अखेर पार्थडीतील १३ वर्षांच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल !

पाथर्डीत जेवणाचं ताट हरवल्याने १३ वर्षांच्या मुलाला इतका जबर मानसिक त्रास दिला, की त्याने थेट आत्महत्येचे पाऊल उचलले. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण ? सगळं सांगतो. पण, आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो करायला विसरू नका.

मंडळी, पाथर्डीतील वसतिगृहात राहणाऱ्या सातवीतील एका 13 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. समर्थ आबासाहेब खरात असं त्याच नाव. मंडळी, काही दिवसांपूर्वी वसतिगृहात समर्थचं जेवणाचं ताट हरवलं. याच कारणावरून शिक्षक सुभाष घुगे त्याला सातत्याने मानसिक त्रास देत होता.

समर्थच्या वडिलांनी वसतिगृहात जाऊन, हरवलेल्या ताटाचे पैसे देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र, तरीही त्रास सुरूच राहिला अन म्हणूनच त्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याचं कुटुंबीयांचा आरोप आहे.

दरम्यान घटनेनंतर समर्थच्या लहान भावाने वडिलांना फोन करून, समर्थच्या पोटात दुखत असल्याचं कारण सांगून वडिलांना लवकर बोलावले. वडील वसतिगृहाकडे निघाले, तेव्हा समर्थला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळाली. मात्र, तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button