Latest

बॅटरीपासून स्क्रीनपर्यंत… आयफोन १८ च्या दुरुस्तीचा खर्च किती ? आकडे ऐकून धक्काचं बसेल !

तुमच्याकडे आयफोन आहे का ? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे ! कारण आयफोन खरेदी करणं महाग आहेच, पण तो खराब झाल्यानंतर दुरुस्तीचा खर्चही तुमच्या खिशाला मोठा फटका देऊ शकतो. नेमका किती खर्च येतो, सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा!

मंडळी, नुकत्याच चर्चेत आलेल्या आयफोन १८ प्रो मॅक्सच्या २५६ जीबी मॉडेलची किंमत १ लाख ७९ हजार ९०० रुपये, तर २ टीबी मॉडेलची किंमत तब्बल ३ लाख २९ हजार ९०० रुपये आहे.

आता दुरुस्तीचे दर ऐका ! बॅटरी बदलण्यासाठी १३ हजार ९०० रुपये, मागील काचेच्या दुरुस्तीसाठी १६ हजार ९०० रुपये, तर मागील कॅमेऱ्यासाठी २८ हजार ९०० रुपये खर्च येऊ शकतो.

स्क्रीन बदलायची असेल, तर तब्बल ४२ हजार ९०० रुपये मोजावे लागू शकतात. स्क्रीन आणि मागील काच दोन्ही खराब झाल्यास खर्च ५१ हजार ९०० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. तर मग मंडळी, तुमच्याकडे कोणता आयफोन आहे ? कमेंटमध्ये नक्कीच सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button