Latest

प्रतीक्षा संपणार ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ ८४ हजार रेशन कार्डधारकांना सवलतीच्या दरात मिळणार साखर !

अहिल्यानगरच्या रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यातील हजारो रेशन कार्ड धारकांना सवलतीच्या दरात लवकरच साखरेचे वितरण होणार आहे. नेमका कोणाला मिळणार हा लाभ ? सगळं सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल ८४ हजार अंत्योदय रेशनकार्डधारकांना प्रत्येकी एक किलो साखर देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, दसरा होऊन गेला तरी अनेक लाभार्थ्यांना ही साखर मिळालेली नाही.

विशेष म्हणजे, पुरवठा विभागाकडे साखरेचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरीही साखर वाटप का थांबलंय ? तर यामागे आहे तांत्रिक अडचण ! स्वस्त धान्य दुकानांमधील ई-पॉस मशीनवर साखर वाटपाचा डेटा अद्ययावत झालेला नाही. त्यामुळे साखर उपलब्ध असूनही दुकानदारांना तिचं वितरण करता येत नाही. यासंदर्भात राज्य सरकारला डेटा अपडेट करण्याची मागणी कळवण्यात आली आहे.

डेटा अपडेट झाल्यानंतर साखर वाटप सुरू होईल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र, आता लाभार्थ्यांना साखर मिळण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार, हा प्रश्न कायम आहे. तुम्हाला रेशनवर साखर मिळते का? कमेंटमध्ये नक्की सांगा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button