
बँक ग्राहकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. बँकेत पैसे जमा करताना तसेच पैसे काढताना आता शुल्क भरावे लागू शकते. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, ICICI बँकेने रोख व्यवहारांच्या शुल्कात बदल जाहीर केल्याची माहिती समोर आली असून, हे नवे नियम १ डिसेंबर २०२६ पासून लागू होणार आहेत.
नव्या नियमानुसार, ग्राहकांना दर महिन्याला रोख रक्कम जमा करण्यासाठी तीन आणि पैसे काढण्यासाठी तीन मोफत व्यवहार मिळतील. मात्र, या मर्यादेपलीकडे व्यवहार केल्यास अतिरिक्त शुल्क लागू होऊ शकतं.
याशिवाय, रोख व्यवहारांसाठी प्रत्येक एक हजार रुपयांमागे चार रुपये किंवा किमान १५० रुपये, यापैकी जास्त शुल्क आकारलं जाण्याची माहिती देण्यात आली आहे.
त्यामुळे वारंवार रोख व्यवहार करणाऱ्या ग्राहकांनी व्यवहारांची संख्या आणि शुल्काच्या अटी तपासणं गरजेचं आहे. या नव्या नियमांबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.





